विविध कार्यक्रमांनी शेंडीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अहमदनगर,दि.(महेश कांबळे)शेंडी ग्रामपंचायतीच्यावतीने विविध कार्यक्रमांनी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त अभिवादन,स्वच्छता रैली,घंटागाडीचे उदघाटन,उद्योग विषयक मार्गदर्शन असे उपक्रम घेण्यात आले.

प्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी जिल्हा उद्योग केंन्द्राचे अधिकारी बालाजी बिराजदार व खलील हवालदार,सरपंच प्रयागा लोंढे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आतकर,ग्रा प सदस्य सागर शिंदे,सुनिल देठे,गिता त्र्यंबके,श्वेता देठे,शेहेनाज पठाण,दत्तां राऊत आदींसह सोसायटीचे चेअरमन संतोष शिंदे,उस्माण पठाण,हरीभाऊ कराळे,एकनाथ गुंड,राजू शिंदे,बबन शिंदे,बाबासाहेब पडोळे,मुख्याधापक लाड आदींसह ग्रामस्थ,महिला वर्ग मोठ्या संख्नेने उपस्थित होता 

       यावेळी १५ व्या वित्त आयोग अनुदानातून घेण्यात आलेल्या घंटागाडीचे उदघाटन करण्यात आले तर गावातून जिल्हा परिषद शाळेच्या मुलासह महिला व पुरुष वर्गांनी स्वच्छता रैली काढली नंतर झालेल्या कार्यक्रमात उद्योग विषयक मार्गदर्शन करण्यात आले 

       सरपंच लोंढे म्हणाल्या सावित्रीबाई फुले या समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.आज देशभरात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जात आहे.सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे.सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे.

      त्या पुढे म्हणाल्या कि त्याच्या जन्मदिनी गावात घंटागाडी आली आहे असे सांगून त्यांनी घनकचरा व्यवस्थापन व सुका व ओला कचरा याबद्दल माहिती दिली व जमा झालेला कचरा पासून खत निर्मिती करणार असून शेंडी गाव प्लस्टिक मुक्त करणार आहे असेही त्या म्हणाल्या 

     जिल्हा उद्योग केंन्द्राचे अधिकारी बालाजी बिराजदार यांनी पतंप्रधान रोजगार योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ची माहिती दिली १ ते ५० लाखापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या योजनांतर्गत कर्ज मिळते व त्यावर १५ ते ३५ टक्के अनुदान मिळत आहे नवीन उद्योजकांनी,युवक युवतींनी त्याचा लाभ घेऊन आपला स्वतःचा उत्पादन उद्योग किंवा सेवा उद्योग सुरु करावा त्यासाठी आम्ही सहकार्य करू असे सांगून त्याची सविस्तर माहिती दिली