आळेफाटा पोलिसांनी पकडला गांजा

आळेफाटा(प्रतिनिधी)ओरीसाहून जुन्नर तालुक्यात विक्री साठी येत असलेला सहा लाख रुपये किंमतीचा गांजा आळेफाटा पोलिसांनी पकडला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि आळेफाटा पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर आळे खिंडीत केलेल्या नाकाबंदीमध्ये मंगळवारी(दि.२९) पहाटे ही कारवाई करण्यात आली.

जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील सुदर्शन डोंगरे आणि पश्चिम बंगालचे रहिवासी देवसुंदर अमलेश महती यांनी ओरीसाहून २३किलो ७१९ ग्रॅम वजनाचा ५ लाख ९२ हजार रुपये किमतीचा गांजा खरेदी करून ट्रकमधून जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गाने येत असताना आळे खिंडीत नाकाबंदी सुरू पोलिसांनी ट्रक थांबविला.पोलिस शिपाई नागरे यांना तपासणी करताना ट्रकमधून उग्रवास येत असल्याने पाहणी केली असता त्यात गांजा आढळून आल्यानंतर कारवाई पोलिस उपनिरीक्षक विनोद दुर्वे पोलिस शिपाई शैलेश वाघमारे यांनी कारवाई करत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.   

पोलिस अधीक्षक डॉ पंकज देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील सुदर्शन डोंगरे आणि पश्चिम बंगालचे रहिवासी देवसुंदर अमलेश महती यांच्याकडून २३ किलो ७१९ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गांजा आणि ४५ लाख रुपये किमतीची ट्रक असा ५० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.