ओझोन घंटागाडी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लोकार्पण सोहळा

जुन्नर(प्रतिनिधी)श्रीक्षेत्र ओझर(ता.जुन्नर)येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टसाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान २०२४-२५ च्या फंडातून ओझोन घंटागाडी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लोकार्पण सोहळा पार पडला.

जिल्हा नियोजन समिती सदस्या आशाताई बुचके,पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा कार्यकारी अध्यक्ष गणेश कवडे यांच्या विशेष प्रयत्नातून ओझोन घंटागाडी प्राप्त झाली.

श्रीक्षेत्र ओझर येथे,जिल्हा नियोजन समिती सदस्या आशा बुचके,पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष गणेशभाऊ कवडे,गटविकास अधिकारी भोईर,भाजपा तालुकाध्यक्ष श्री.संतोषनाना खैरे,श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांच्या हस्ते या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी उद्योजक रवीभाऊ गायकवाड,ओझर नं.२ च्या सरपंच तारामती कर्डक,ओझर नं.१ च्या मा.सरपंच मथुरा कवडे,ओझरचे तलाठी दुलत,ग्रामसेवक थोरात,किशोर कवडे,उपसरपंच सुभाष दळवी,आनंदराव मांडे,रंगनाथ रवळे,दशरथ मांडे,विकास कवडे,पुंडलिक कवडे,श्रीराम पंडित,रघुनाथ कवडे,अंबादास कवडे,बाळासाहेब टेंभेकर, गणपत टेंभेकर,पांडुरंग जगदाळे,शशी पोखरकर,ज्ञानेश्वर कवडे,राजेंद्र कवडे, गणेश थोरात,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन कवडे गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर विजय नवले,आनंद कवडे,ओंकार पंडित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.