प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंबेगाव तालुका उपाध्यक्षपदी भानुदास लोंढे यांची निवड

मंचर (प्रतिनिधी)प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंबेगाव तालुक्याच्या उपाध्यक्षपदी भानुदास भागाजी लोंढे (रा. वाळुंजवाडी, वडगाव काशिंबेग) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार, तसेच तालुका अध्यक्ष जितेंद्रभाऊ भालेराव यांच्या शिफारसीनुसार ही निवड करण्यात आली आहे.

भानुदास लोंढे हे वाळुंजवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दिव्यांग बांधव, विधवा महिला, शेतकरी व समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांच्यावर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

निवडीचे पत्र स्विकारल्यानंतर भानुदास लोंढे यांनी पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांचे आभार मानले असून, “पक्षवाढ, गोरगरीब जनता आणि दिव्यांग बांधवांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडीमुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंबेगाव तालुक्यातील कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.