शिवसेना (शिंदे गट) जुन्नर तालुकाप्रमुखपदी बाबू पाटे यांची नियुक्ती

जुन्नर:-शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जुन्नर तालुकाप्रमुखपदी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी मंगळवारी (दि. २८ जुलै) केली. पाटे यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शिवसेना संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या वेळी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. महिला तालुकाप्रमुखपदी स्वाती ढोले, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत, जुन्नर विधानसभा संघटक विश्वास आमले, विधानसभा समन्वयक प्रदीप देवकर यांची निवड झाली.

शहरप्रमुखांची यादी पुढीलप्रमाणे :

नारायणगाव : संतोष वाजगे

जुन्नर शहर : अविनाश कर्डिले

आळेफाटा : तुषार कुऱ्हाडे

ओतूर : प्रसाद डुंबरे

बेल्हे : नीलेश कणसे

वारुळवाडी : अतुल कानडे

शहर समन्वयक :

नारायणगाव : ज्ञानेश्वर आवटी

आळेफाटा : प्रदीप देवकर

ओतूर : उमेश डुंबरे

जुन्नर शहर : दीपेश परदेशी

याशिवाय, जुन्नर तालुका शेतकरी सेनेचे प्रमुख जयसिंग पोटे, सहकार सेनेचे प्रमुख संदीप लेंडे, तसेच कायदा आघाडी प्रमुखपदी अॅड. सचिन चव्हाण यांची निवड करण्यात आली.

तालुका उपप्रमुखपदी भागेश्वर डेरे, संतोष चव्हाण, दत्ता गवारी, शिवाजी शेरकर, धनंजय डोंगरे, जीवन शिंदे, पंकज कणसे आणि पप्पू डुकरे यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

या निवडींनंतर बोलताना बाबू पाटे म्हणाले, “जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना अधिकाधिक जागांवर विजय मिळवेल, यासाठी प्रयत्न करणार आहे.”