आळेफाटा(प्रतिनिधी)नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी, पुणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी सहलीचं आयोजन उत्साहात करण्यात आलं.यंदा ही सहल थेट “महाराष्ट्राचं मॉरिशस” म्हणून प्रसिद्ध असलेल्या फोफसंडी या निसर्गरम्य ठिकाणी भरविण्यात आली. निसर्गाच्या सान्निध्यात कविता, पाऊस आणि चविष्ट ग्रामीण खाद्यसंस्कृती यांचा मनमुराद आनंद घेणारी ही सहल नक्कीच अविस्मरणीय ठरली.
सकाळी सर्व सहभागी सदस्यांनी जुन्नर येथील शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सहलीचा शुभारंभ केला. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसात, शेकडो धबधबे आणि थंडगार वाऱ्याच्या सान्निध्यात सर्वांनी पावसात चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
फोफसंडी गावात पोहोचल्यावर पारंपरिक शेंगोळी, बाजरी भाकरी, शिरा, कढी, लोणचं अशा चविष्ट स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. कवी वादळकार, सुरेंद्र विसपुते, यशवंत घोडे यांच्या प्रेम, पाऊस, निसर्ग आणि जीवनावर आधारित कवितांनी उपस्थितांची मनं जिंकली.
स्थानिक मार्गदर्शकांनी फोफ हाऊस, कोंबड किल्ला, मांडवी ऋषींची गुहा, मांडवी नदीचा उगम अशा परिसरातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळांची माहिती दिली. या भागातील धबधबे, टेकड्या, किल्ले आणि निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेत सर्वजण समाधानाने परतीच्या मार्गाला लागले.
या सहलीत सौ. अलका खोसे, सुनील थोरात, ऋचा भोसले, सौ. दिव्या भोसले, सौ. प्रिती सोनवणे, चि. साईराजे सोनवणे, सौ. संगीता सोनवणे, राजेंद्र सोनवणे, प्रताप जगताप, संपत नायकोडी, सचिन फुलपगार, ज्ञानेश्वर काजळे, किसन शिंगोटे, सौ. संगीता शिंगोटे, विजया सोनटक्के, प्रशांत सोनटक्के, प्रतिक्षा विसपुते, सुरेंद्र विसपुते, विजया माळवदकर, अशोक कुलकर्णी, बबन चव्हाण, बाळू गावडे, सौ. सविता गावडे, श्वेता साठे, रोहन साठे, तेजल देडगावकर, सुनिता पांढरकर, अशोक पांढरकर, सुमन शिंगेवार, अनुराग मिश्रा यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या सहलीचे संयोजन प्रा. राजेंद्र सोनवणे, यशवंत घोडे, सुरज वाजे, अभिषेक घोडे, रोशन तुपे यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.