शालेय खो-खो स्पर्धेत समर्थचे चार संघ उपविजेते

बेल्हे:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय, क्रीडा परिषद पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व जयहिंद इंटरनॅशनल स्कूल कुरन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज बेल्हेच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करीत चार गटांत उपविजेतेपद मिळवले.

या स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत भरघोस यश संपादन केले.

प्राप्त यश पुढीलप्रमाणे –

समर्थ गुरुकुल

 १४ वर्षाखालील मुले – द्वितीय क्रमांक

 १७ वर्षाखालील मुले – तृतीय क्रमांक

 १७ वर्षाखालील मुली – द्वितीय क्रमांक

समर्थ ज्युनिअर कॉलेज

१९ वर्षाखालील मुले – द्वितीय क्रमांक

१९ वर्षाखालील मुली – द्वितीय क्रमांक

खेळाडूंना क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे, सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी व राहुल अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. समर्थ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, नेटबॉल, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.

संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सांगितले की, “खेळाडूंच्या मेहनतीसोबत क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सरावामुळेच हे यश शक्य झाले.”

या विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जि.प. सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्या वैशाली आहेर व प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी अभिनंदन केले.