पाडळी तर्फे आळे :-वेदना जितकी सुंदर बोलते ना… तितकं सुख कधीच बोलत नाही… हा अनुभव घेण्याचा योग काल श्रोत्यांना आला. निमित्त होतं एक भाकर तीन चुली अभिप्राय स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचे.
देवा झिंजाड लिखित एक भाकर तीन चुली वरील अभिप्राय स्पर्धेचे आयोजन अळकुटीतील पंचक्रोशी मध्ये केले गेले होते. कै. लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ हा आगळावेगळा उपक्रम डॉ. उत्तम थोरात परिवार आणि पिंटो ग्रंथालय यांनी राबवला होता. यानिमित्ताने शेकडो अभिप्रायमधुन स्त्री वेदना आणि साहित्याला ख-या अर्थाने वाचा फुटली आहे. अभिप्राय मधून ग्रामीण महिलांचे जीवन.. त्यांची दुःख आणि प्रेरणा यांचे वास्तव समाजासमोर आले. पाडळी आळे येथे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रतिभा सूर्यराव (ढमढेरे),
द्वितीय पारितोषिक सुरेखा गुंजाळ.
तृतीय पारितोषिक छाया पायमोडे,
चतुर्थ क्रमांक सौ.वर्षा कोळपे सुनिल खामकर, पंचम पारितोषिक भाऊसाहेब जगताप ,पुष्पा गुंजाळ यांना सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे आणि लेखक देवा झिंजाड यांच्या हस्ते प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर सुंदरलाल गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आली. उत्तेजनार्थ स्पर्धकांना व परीक्षक जया कुलथे आणि विक्रीकर उपायुक्त योगेश डेरे यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी तरुण तडफदार वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे ह्यांची उपस्थिती होती. त्यांच्या अमोघवाणीने आई बाप आणि मानवी नात्यांचा संवेदनशीलपणे जागर करण्यात आला.
गणेश शिंदे यांच्या अमोघ वाणीतून सामाजिक प्रेरणादायी विचार पंचक्रोशीतील हजारो नागरिक अंतर्मुख झाले. कार्यक्रमाची सुरुवात सुखदा थोरात शास्त्रीय संगीत बालगायिकेने करुन आपल्या कोमल आवाजाने उपस्थित श्रोते भारावून गेले.
लेखक देवा झिंजाड यांची काळजाला हात घालणारी आई वरची कविता ऐकून ती आपलीशी होऊन डोळ्यातून वाहीली.
तसेच संतोष थोरात यांनी सादर केलेला ताई व आप्पाचा संवाद ऐकताना श्रोत्यांनी दाटून आलेला हुंदका अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बन्सी डेरे यांनी लढवय्या स्त्रीचा संघर्षपट सांगताना वेदनेची सत्यकथा कथन करताना श्रीमंतीचा आतुन फाटलेला अंगरखा एक बाई माणूस कशी पैलवत होती ही वास्तववादी कहानी ऐकून उपस्थित जन-आवक झाले.
कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना वसंत थोरात यांनी आईचा स्पर्श हे भावस्पर्शी कथानक आभार सगळ्यांच्या काळजाला स्पर्श करून उपस्थितामध्ये गलबलून आले.
काल पाडळी आळे येथे अभिप्राय पारितोषिक वितरण कार्यक्रमात, ग्रामीण साहित्यातील वेदना, संस्कार, विचार, आईबाप, साहित्याची किनार असे आगळे वेगळे धाटणीची मांडणीचे आयोजन चर्चेचा विषय ठरले.
ज्ञानदेव लंके, सुमनताई दाते, विश्वनाथदादा कोरडे,पांडुरंग पवार, सिताराम कापसे, गंगाराम बेलकर, डॉ फडतरे, सचिन वराळ, मधुकर उचाळे कुंदनकाका साखला ,डॉ. श्रीकांत पठारे, नाना पाटील लंके, संतोष डेरे, पोपट डेरे, विष्णू जगताप, बाबासाहेब दाते आदी मान्यवर उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी डॉ वर्ग व पंचक्रोशीतील बहुसंख्य सरपंच चेअरमन यांची उपस्थिती लक्षणीय होती.
*याप्रसंगी डॉ. उत्तम थोरात यांनी आपली आई कै. लक्ष्मीबाई थोरात स्मरणार्थ आजूबाजूच्या शाळा आणि वाचनालय , ग्रंथालय यांना लेखक देवा झिंजाड ह्यांच्या दोन्ही पुस्तकांचे 25 सेट देण्याचे सुद्धा जाहीर केले*.
*नाशिक येथील आर्किटेक बन्सी डेरे आणि कवी देवा झिंजाड यांनी पाडळी आळे गावातील पिंटो ग्रंथालयाला शेकडो पुस्तके सुद्धा दान केली*.
-उपस्थितांमधून प्रतिक्रिया-
माझ्या अख्या आयुष्यामध्ये अशी गर्दी बघितली नव्हती. आणि असा आगळावेगळया धाटणीचा कार्यक्रम गेली 50 वर्षात अळकुटी पंचक्रोशीत बघितलेला नाही धन्य झालो. अशा भावना बबन रभाजी डेरे यांनी व्यक्त केल्या.
शेतात राबणारे, घरकाम करणारी महिला वर्गाची पावले ग्रंथालयात येऊ लागतात.. त्यांच्या हातात पुस्तके दिसू लागतात तेंव्हा या उपक्रमाचे फलित झाले.