पिंपळगाव रोठा येथे बहुजन बलुतेदार संघटनेची मिटींग संपन्न;तालुकास्तरीय कलावंत मेळाव्याची घोषणा

पारनेर (प्रतिनिधी)पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील खंडोबा देवस्थान परिसरात बहुजन समाजातील बलुतेदार संघटनाच्या वतीने भव्य मिटींगचे आयोजन करण्यात आले. या मिटींगमध्ये कलावंतांसाठी लवकरच तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पारनेर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांनी दिली.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मातंग संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मोहनभाऊ साळवे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक बहुजन आघाडी जुन्नर तालुकाध्यक्ष उत्तम वायदांडे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी आधुनिक जय लहुजी वस्ताद पारनेर तालुकाध्यक्ष रामदास साळवे, सामाजिक कार्यकर्ते गणेश पोपटराव शिरसागर, जेष्ठ विचारवंत प्रवीण क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळवे, युवा संघटक राहुल भाऊ आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते गणेश जेजुरकर (वडझिरे), संपर्कप्रमुख गणेश साळुंखे (बहुजन संघटना), तसेच किरण नवगिरे, किरण ससाने, चंद्रकांत चौधरी, शाहीर शामराव शिंदे (कोलठणकर), पांडुरंग क्षीरसागर, बारकू जेडगुळे, पोपट माळी, समाधान शिंदे, राहुल शिरसागर व वैभव क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मिटींगला पारनेर तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या वेळी वक्त्यांनी पारनेर तालुक्यातील सर्व बहुजन बारा बलुतेदार व अठरा पकड जातींना एकत्र आणून “गाव तिथे शाखा” हे धोरण राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.

राहुल आल्हाट यांनी यावेळी सांगितले की, “तालुक्यातील ५०० युवक कार्यकर्त्यांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बहुजन बलुतेदार संघटना सज्ज आहे.”

या मिटींगमुळे पारनेर तालुक्यात बहुजन बारा बलुतेदार समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक एकजुटीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.