अहिल्यानगर : दैनिक लोकपरिवर्तन यांच्या वर्धापन दिन व सन्मान सोहळा २०२६ निमित्त कला क्षेत्रात आपल्या निवेदनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे युवामित्र गणेश विलास पाडेकर यांना ‘दैनिक लोकपरिवर्तन राज्यस्तरीय उत्कृष्ट युवानिवेदक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
कळस, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथील गणेश पाडेकर हे निवेदक व कलाकार म्हणून कार्यरत असून, विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या निवेदनातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कला क्षेत्रासोबतच ते साई मोरया एंटरटेनमेंट अँड इव्हेंट्स कंपनीच्या माध्यमातून इव्हेंट्स क्षेत्रातही कार्यरत आहेत.
अहिल्यानगर येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील तसेच विविध तालुक्यांतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पाडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना युवामित्र गणेश पाडेकर म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून, माझ्या निवेदन क्षेत्रातील प्रवासाला मिळालेली प्रेरणादायी शाबासकी आहे. पुढील काळातही आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहून उत्तम कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील.”