बळीराजाला प्रतीक्षा सोयाबीन भाववाढीची :पावसाचा फटका बसल्याने बाजारभाव मिळेना

बेल्हे,दि.(सुरेशभुजबळ)जुन्नर तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील शेती कामाकडे वळला आहे. अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याचे नियोजन करणे सुरू आहे. मात्र, शेती करण्यासाठी हाताशी पैसे असणे गरजेचे आहे, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे यांची तजवीज करण्यासाठी धडपड करत असतो.

हक्काचा आर्थिक स्रोत शेतकरीवर्गाला नसतोच. शेतीमधून जे उत्पादन होईल त्याची विक्रीतून त्यांना दोन पैसे मिळतात. सध्या शेतकरी सोयाबीन नाइलाजाने विक्रीसाठी बाजारात आणत असल्याचे चित्र दिसत आहे, परंतु म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दोन वर्षापूर्वी जून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे दर १० हजार रुपये क्विंटलच्या घरात होते. यामुळे यावर्षीदेखील सोयाबीनच्या दरात चांगली तेजी राहील, या विचाराने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली.

मागील वर्षीचे १० क्चिटल सोयाबीन याच महिन्यात विकले तेव्हा बाजारभाव ७० ते ८० किलो भाव मिळाला. सोयाबीनचे भाव वाढेल या आशेवर थांबलो. परंतु, आता नवीन हंगामासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे वा मिळेल त्या भावात विकावे लागले असे सोयाबीन उत्पादक राहुल मते यांनी सांगितले.

सरकार जोपर्यंत आयात-निर्यातीच्या धोरणाबद्दल निर्णय घेत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचा फायदा होणार नाही. याचे कारण सरकारने आवात करून शेतीमालाचे भाव पाडायचे आणि दुसरीकडे निर्यात थांबूनसुद्धा शेतीमालाचे भाव पाडायचे हे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे कधीही पडणार नाही,असे शेतकरी म्हणतात.

मिळेल त्या भावाने विक्री

• पुढील काळात सोयाबीनचे दर वाढण्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे.

• बाजारात दरवाढीच्या आशेने व बियाण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवली होती. पण अधिक काळ सोयाबीन ठेवल्याने ही तूट येते.

■ यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोया- बीनदेखील विक्रीसाठी

काढले आहे.

■ शेतकऱ्याच्या हातात नगदी पिक असूनही पैसा मिळत नाही, त्यामुळे तो त्रस्त आहे.