पारनेर(श्रीकांत चौरे):अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमनात पोहोचविण्याचे ध्येय समोर ठेवून आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवस्वराज्य यात्रेचे प्रस्थान आज राहुरी शहरात झाले .प्रसंगी आमदार निलेश लंके यांचे हितचिंतक व शिवप्रेमींनी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत जिल्हा परिषद सदस्य सौ राणीताई निलेश लंके यांचे जंगी स्वागत केले गेले .
यावेळी पत्रकाराशी बोलताना सौ.राणीताई लंके यांनी कुणी साखर वाटो,या डाळ वाटो आम्ही आमच्या कामांच्या जोरावर व लोकांच्या अडीअडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी नव्हे तर सोबत राहून लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार आ.निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी पुनश्च एकदा केला आहे.
शुक्रवारी सकाळी राहुरी शहरातील नगर- मनमाड रोडवर मल्हारवाडी चौकात शिवस्वराज्य यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राणीताई लंके यांच्यावर पाच जेसीबीच्या साह्याने कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली आहे.
प्रसंगी सौ. लंके म्हणाल्या की, शिवरायांच्या राज्याभिषेकला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने मोहटा देवीचा आशीर्वाद घेऊन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करत आहोत. आ.निलेश लंके यांनी कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मतदार संघातील लोकांचे जीव वाचवले आहेत.
या कोविड सेंटरचा सर्वदुर गवगवा झाला. त्यामध्ये अनेक लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत. पक्षाने आदेश दिल्यास आम्ही ही लोकसभा निवडणूक लढणारच आहोत त्यासाठी आता आम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घराघरापर्यंत पोहोचत आहोत. खासदार सुजय विखे यांच्या पत्नी रणरागिणी महिला मंडळाचे अध्यक्ष धनश्रीताई विखे या देखील मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र त्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनमानसात दिसत आहे तर आम्ही गेल्या अडीच वर्षापासून जनसामान्यांशी जोडलो गेलो आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची कुठलीही भीती वाटत नसल्याचे म्हणत सौ.विखेंवर नाव न घेता टिका केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितिचे संचालक रामदास बाचकर यांनी केले.तर सुञसंचालन अॅड. राहुल झावरे यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे मा.संदस्य धनराज गाढे, मंगेश गाढे, संदिप आढाव, अमोल बेल्हेकर, दलित चळवळीचे बाळासाहेब जाधव, सुनिल कोकरे, भाऊसाहेब चौरे,हरिदास जाधव,नितीन भांबळ, आर.आर.राजदेव, नंदु दळवी , दिनेश बोरुडे , गणेश आहेर, प्रवीण वारुळे,बाळासाहेब काळे,दत्तात्रय फुंडे,दत्तात्रय खताळ,राजू मकासरे, राहुल तमनर,सुनील औटी, अक्षय गडाख तुषार वाळके, सुदर्शन पडवळ, गणेश घनदाट, परशराम हारदे, मनसुरी पिंजारी, मुजहीद पिंजारी रशीद पिंजारी, अरिफ पिंजारी सादिक पिंजारी ,रहमान पिंजारी, डॉ अनिल कदम आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
दरम्यान राहुरी बस स्टॅन्ड जवळील आरपीआय आठवले गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयास जिल्हा परिषद सदस्य राणिताई लंके यांनी भेट दिली. यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रविण लोखंडे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. अनिल पलघडमल, योगेश घाडगे, श्री.विधाते आदी उपस्थित होते.