बेल्हे,दि.(प्रतिनिधी)कोरठण खंडोबा देवाची मानाची समजली जाणारी बेल्हे काठी पालखी सोहळा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.त्यामुळे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या कोरठण खंडोबा यात्रोत्सवात मानाच्या काठी पालखी सोहळयाच्या आनंदाला भाविकांना यंदा मुकावे लागणार आहे.
अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा नवीन विश्वस्त मंडळाने गेल्या दोन वर्षापासून खंडित करून बेल्हे करांना झुगारून देऊन दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोरठण खंडोबा मुळ मंदीराचे पुरातन बांधकाम बेल्हे गावकऱ्यांनी केले असल्याचा शिलालेख मंदिरामध्ये आहे.
त्यानुसार बेल्हेकरांचा आणि देवस्थानचा सुमारे ४५० वर्षांचा इतिहास आहे.त्या प्रमाणे बेल्हे करांना यात्रेला मान दिला जात नाही.
सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या कोरठन खंडोबा यात्रेवर बेल्हे येथील मानाच्या काठी पालखी मानकरी यांनी व बेल्हे ग्रामस्थांनी कोरठन यात्रेला काठी पालखी घेऊन न जाण्याचा निर्णय सर्वांनु मते घेण्यात आला आहे असे काठी पालखी समितीचे अध्यक्ष राजेंद्र मटाले व सचिव संकल्प विश्वासराव यांनी सांगितले आहे.
अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा बेल्हे ग्रामस्थांना शासकीय नियोजनाच्या बैठकीला निमंत्रण पत्र गेल्या दोन वर्षापासून प्रशासक व नवीन विश्वस्त मंडळ पाठवत नसल्यामुळे बेल्हे ग्रामस्थांना मध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे १६ जानेवारी २०२४ रोजी कोरठण येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीला बेल्हे गावच्यावतीने कोणीही ग्रामस्थ व मानकरी उपस्थित राहिलेले नाहीत.
बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी वृत्तपत्रात विश्वस्त मंडळांने दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे बेल्हे गावात संभ्रम निर्माण केला गेला आहे प्रत्यक्षात गावातील कोणत्याही व्यक्ती बरोबर चर्चा झालेली नसल्याने बेल्हे गावात लोकांमध्ये कोरठन खंडोबा देवस्थानचे विश्वस्त मंडळा बद्दल तीव्र नाराजी आहे त्यामुळे यात्रेसाठी मनाची काठी व पालखी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामस्थांनी ही काठी व पालखी कळस रोडवरील खंडोबा देवाचे स्थान असलेल्या पाउतके या ठिकाणी घेऊन उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत गाव बैठक झाली असून बैठकीला गावचे उपसरपंच राजेंद्र पिंगट,माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ ,विश्वनाथ डावखर,श्री मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकु डावखर विजय घोडके,सुनील आरोटे,ग्रामपंचायत सदस्य ताराचंद मुलमुले,काठी पालखी समितीचे उपाध्यक्ष रमेश विश्वासराव सदस्य धोंडीबा पाबळे,नितीन विश्वासराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते .