अहमदनगर(महेश कांबळे)-गेली अनेक दिवस लोकांनी गजबजलेली अवतार मेहरबाबाची समाधी टेकडी आज सुनी सुनी झाले ३ दिवसाच्या उत्सवानंतर राहिलेले भाविक व स्वयंसेवक आज परंतु जाऊ लागले आहे.आम्ही जातो आमच्या गाव आमचे जय मेहरबाबा घ्यावा असे जणू म्हणत एकमेकांना जय बाबा,जय मेहेर म्हणत पुढील वर्षीच्या अमरथीतीला भेटु असे म्हणत जगातील व राज्यातून आले भाविक आज परतले आहे त्यामुळे परिसरात पूर्ण शांतता आहे
अवतार मेहेरबाबांची समाधी असलेलं मेहेराबाद नगरपासून अवघ्या सहा किलोमीटरवर आहे तिथले पावित्र्य,स्वच्छता,शांतता आणि स्वयंशिस्त पाहिली की इतक्याजवळ असून आपले नगर शहर का नाही सुधारले याचं आश्चर्य वाटतं. कुठंही कागदाचा कपटा नाही,कुठं थंुकलेलं नाही.कुणाच्या हातात सिगारेट नाही की,कुणाच्या तोंडात तंबाखू-गुटख्याचा तोबरा नाही.”इथे थुंकू नका’,”धूम्रपान केल्यास इतका दंड’असा एकही फलक नसताना मेहेराबादनं स्वच्छतेचा वसा जपला आहे.
दौंड रस्ता ओलांडून टेकडीवरच्या समाधीकडे निघालं की, दोन्ही बाजूला असलेली वडाची झाडं आपलं स्वागत करतात.वाहनांसाठी शेजारून लहानसा घाटरस्ताही आहे,पण चालत जाण्यातली मौज काही आैरच.पहिल्या महायुद्धात लष्करी छावणीसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा उपयोग मेहेरबाबांना प्रारंभीच्या काळात वास्तव्यासाठी झाला.आता तिथं त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय आहे.शेजारच्या खोलीत ग्रंथालय आणि वरच्या मजल्यावर मेहेरबाबांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी फोटो गॅलरी आहे.या “मेहेर रिट्रीट’शेजारी मेहेरबाबांची विश्रांतीची खोली आणि स्वयंपाकघर आहे.आजही ते जसंच्या तसं जपण्यात आलं आहे.समाधी मंदिराशेजारी असलेल्या छोट्या पत्र्याच्या खोलीत मेहेरबाबा राहत होते.तीही खोली अजून जशीच्या तशी जतन करण्यात आली आहे.समाधी मंदिर असलेल्या टेकडीवर हजारो झाडं लावण्यात आली असून पाण्याची टंचाई असतानाही ती उत्तमरीत्या वाढवण्यात आली आहेत.
टेकडीच्या मागच्या बाजूला असलेलं एमपीआर (भक्तनिवास)तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं वास्तूशिल्प आहे.मेहेरबाबांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची भव्य चित्रं असलेली मेस,शेजारच्या उद्यानात असलेले संगमरवरी शिल्प आणि चित्रं काढलेल्या टाइल्सनं सजवलेली भिंत तर बघत राहावी अशी आहे.इतिहास कसा जपावा हे इथं पाहायला मिळतं.
देश-विदेशातील मेहेरप्रेमी इथं येतात पण कुठे गोंगाट नाही की अस्वच्छता नाही.स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांचा ताफाही नाही.”सेवेत प्रभुत्व’ही मेहेरबाबांची शिकवण अंमलात आणत प्रत्येक जण येथे सेवाभाव जपत असतो.त्याचे अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे