रमाई फाउंडेशनच्यावतीने  जागतिक महिलादिन उत्साहात

वडगांव आनंद | येथे रमाई फाउंडेशनच्यावतीने  जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडगांव आनंद परिसरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या हिराबाई काशिकेदार,रंजना काशिकेदार,रुक्मिणी लोखेडे,आशा कारिरीकदार,मंगल काशिकेदार,सुविता काशिकेदार,अँड.अनुराधा ताई कोरिकिबार, गायत्री काशिकेदार,वर्षा कारिकिदार,पूजा अमर लोखंडे,वैषाली लोखंडे यामहिलांचा बौद्ध विहार सन्मान करण्यात आला.

यावेळी हिराबाई काशिकेदार,रंजना काशिकेदार, रुक्मिणी लोखेडे,आशा कारिरीकदार,मंगल काशिकेदार, सुविता काशिकेदार,अँड.अनुराधा ताई कोरिकिबार यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी काशिकेदार यांनी केले तर आभार माई काशिकेदार यांनी मानले.