नारायणगाव(प्रतिनिधी) :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुर मतदार संघाचे उमेदवार खा.डॉ.अमोल कोल्हे यांना नारायणगावच्या ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा जाहीर करत शिवनेरीच्या छाव्याला पुन्हा संसदेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.
डॉ.कोल्हे यांना पाठींबा जाहीर करण्यासाठी नारायणगाव, वारूळवाडीत गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सर्वानुमते मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा डॉ. कोल्हे यांना संसदेत पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. संपूर्ण गाव एकजुटीने डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही ग्रामस्थांनी यावेळी दिला.
या बैठकीला आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे संचालक, शेतकरी ग्रामस्थ,व्यापारी यांच्यासह
नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे,वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर,माजी सभापती शिवाजीराव खैरे,राजश्रीताई बोरकर,ज्योतीताई संते,वैजयंतीताई कोराळे, माजी सरपंच संतोष वाजगे, आरीफ अतार,ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ, रामदास अभंग,भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री बोरकर,ग्रामो्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,सरपंच शुभदा वाव्हळ,माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती काळे,एमडी भुजबळ,संतोष वाजगे,सरपंच राजेंद्र मेहेर,आशिष माळवतकर,अशोक गांधी,आशिष फुलसुंदर,शंकरराव कोल्हे,देवेंद्र बनकर, जवाहरलाल गुगळे,बाळासाहेब पाटे ,गणेश वावळ,संजय वाजगे,राजाराम पाटे,राजेंद्र कोकणे ,ज्योती संते,रशीद इनामदार,रामदास तोडकरी,आरिफ आतार,आशिष वाजगे,शशिकांत पारधी,तौसीफ कुरेशी रामदास अभंग,जुबेर शेख,देविदास भुजबळ,आशिष फुलसुंदर आदी उपस्थित होते.