नगरच्या अपूर्वा निषाद च्या रामा ओ रामा गाण्याची सोशल मीडियावर धूम

अहमदनगर(महेश कांबळे):सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडे अहमदनगर मधील अपूर्वा निषाद ही गायनाचे धडे गिरवत आहे.या दरम्यान अपूर्वा निषाद यांचा संपूर्ण महाराष्ट्रात “महानिर्माण घडवुया” या गाण्याने धुमाकूळ घातली आहे.

याशिवाय अपूर्वा निषादला गायक डबू मलिक यांच्या“तुम कभी ना भुलना”या गाण्याने त्यांना संपूर्ण राज्यात एक वेगळीच ओळख दिली आहे.तर अपूर्वा निषाद यांचा आता अयोध्येत रामललाच्या मूर्तीचा अभिषेक निमित्त एक नवीन गीत रिलीज झाला आहे.

“रामा ओ रामा”या नावाने नवीन गीत यु ट्यूब  वर रिलीज झाले  आहे.या गीताला सध्या जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.अपूर्वा निषाद यांच्या या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः अपूर्वा निषाद यांनी हे गीत कंपोझ करून त्यांनी गायले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या सजावट पाहात असताना अपूर्वा निषाद यांचे गीत वाजविले गेले  आहे.याच बरोबर सोशल मीडियावर असणारे अध्यात्मिक पेज तसेच  केंद्राने आपल्या सोशल नेटवर्किंग मध्ये “रामा हो रामा” गाणे ट्रेडिंग झाल्याचे कौतुकास्पद विधान केले आहे.

अयोद्धेच्या प्रभू श्रीरामाला नमन करण्यासाठी  प्रसिद्ध गायिका अपूर्वा निषाद यांच्या आवाजातील नवीन गाणं  ‘रामा ओ रामा’ श्रीराम मूर्ती प्रतिस्थापनेच्या वेळी सगळीकडे वाजले गेले,अपुर्वा हि नगरचे प्राध्यापक व निवेदक ,गायक संदीप भुसे व सारडा कॉलेज मधील प्राध्यपिका स्मिता भुसे यांची कन्या आहे