पांगरे : करमाळा तालुक्यातील पांगरे गावात ७५ वा गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय व जि.प.प्रा.शाळा याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहनाठी प्रमुख पाहुने म्हणून सर्कल प्रकाश जगताप हे उपस्तीत होते.या आनंदाच्या क्षणी जि.प.प्रा.शाळा याठिकाणी प्रभात फेरी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कवायताचे खडे व बैठे प्रकार साजरे केले, भाषणे दिली व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मिराजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी शंभूराजे मस्के,सार्थक खेतकर ,संतोष माने व आदेश शेंडगे यांनी वृक्षारोपानाचा,फळ वाटपाचा व खाऊ वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
शाळेतील विद्यार्थी राम पाटील,सौरभ पारेकर,राजनंदिनी फरताडे,अनुष्का पारेकर,स्वरा गोघरे, सरस्वती सोनवणे, आलिया आफ्तर ,कल्याणी पारेकर इ.यांनी आपले देशप्रेम भाषणे,कविता,निबंध व गाणी गाऊन व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सर्कल प्रकाश जगताप,तलाठी संतोष कांबळे , ग्रामसेवक समाधान कांबळे , पांगरे गावचे सरपंच प्रा.विजया सोनवणे, अॅड. दत्तात्रय सोनवणे,उपसरपंच मनिषा गायकवाड,धनंजय गायकवाड,मा.सरपंच गणेश टेकाळे,पोलीस पाटील युवराज सावंत, शाळा व्यवस्तापन अध्यक्ष महेश शेळके, ग्रा.स.सचिन पिसाळ,ग्रा.स.महेश टेकाळे,व्हायस चेरमन बाळासाहेब गुटाळ ,युवा उद्योजक अरुण शेंडगे,जल सुरक्षक गोपाल कोळी,जि.प.प्रा.शाळा मु.संजय जाधव व सहकारी,मा.सै.जोतीराम तोबरेम, मा.सै.महादेव तोबरे, तसेच गावचे ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक डॉ.शंकरशेठ नेवसे, अध्यक्षा सौ.कल्याणी ताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे ऋषीकेश व प्रा. यादव एस.व्ही.आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले .
