पांगरे प्रतिनिधी:करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी डी.आर.सारंगकर यांनी ग्रामीण कृषी कर्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत नुकतेच पांगरे गावात भेट देऊन सद्गुर कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मस्के शंभूराजे, माने संतोष ,खेतकर सार्थक व शेंडगे आदेश यांची भेट घेऊन त्यांनी कृषीदूतांना त्यांच्या कृषी पदवी काळातील अनुभव सांगितले व शेतकर्यांना आधुनिक शेती व सेंद्रिय शेतीबाबत माहिती देण्यास सांगितले.
तसेच त्यांनी कृषी क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना संपूर्ण गावाची रूपरेषा आणि गावाचा दिनक्रम कसा चालतो हे कळवण्यास सांगितले .ग्रामसेवकांनी गावकर्यांच्या वतीने सहकार्य करण्याचे आव्हान केले .यावेळी सर्व कृषीदूतांनी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले व सर्व कार्य व्यवस्तीतरित्या पार पाडण्याचे आव्हान केले.

यावेळी उपस्थित कृषी विस्तार अधिकारी एल.एम.शेख,कृषी तांत्रिक अधिकारी व्ही. एम.फाळके, ग्रामसेवक समाधान कांबळे ,पांगरे गावचे सरपंच प्रा.विजया सोनवणे, अॅड. दत्तात्रय सोनवणे,उपसरपंच मनिषा गायकवाड,धनंजय गायकवाड,शाळा व्यवस्तापन अध्यक्ष महेश शेळके,ग्रा.स.सचिन पिसाळ,ग्रा.स.महेश टेकाळे ,जल सुरक्षक गोपाल कोळी तसेच पांगरे गावातील ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संस्थेच्या संस्थापक डॉ.शंकर नेवसे, अध्यक्षा सौ.कल्याणी ताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. के बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे ऋषीकेश व प्रा.यादव एस.व्ही आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
