पांगरे गावात कृषीदुत राबवणार १० आठवडे शेती विषयक प्रात्यक्षिके व उपक्रम

पांगरे प्रतिनिधी:करमाळा तालुक्याील पांगरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील विद्यार्थी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत मस्के शंभूराजे,खेतकर सार्थक, माने संतोष व शेंडगे आदेश हे विद्यार्थी १० आठवडे पांगरे गावामध्ये राहून विविध शेती विषयक प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत.

विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी पांगरे गावच्या सरपंचांनी गावची थोडक्यात माहिती दिली व विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय पांगरे ता.करमाळा जि.सोलापूर येथील ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी पांगरे गावचे सरपंच प्रा. विजया सोनवणे,अ‍ॅड. दत्तात्रय सोनवणे,उपसरपंच मनिषा गायकवाड,धनंजय गायकवाड,ग्रामसेवक समाधान कांबळे,शाळा व्यवस्तापन अध्यक्ष महेश शेळके,ग्रा.स.सचिन पिसाळ महेश टेकाळे ,जल सुरक्षक गोपाल कोळी तसेच गावचे प्रतीष्टित ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमासाठी कृषी दुतांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे, संस्थापक शंकर नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के बिटे,कार्यक्रम अधिकारी प्रा.ऋषीकेश काळे व प्रा. यादव एस.व्ही आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.