नगर : दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कैलास सत्यार्थी चिल्ड्रंन्स फाउंडेशन,नवी दिल्ली व सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ,आयोजित १६ ऑक्टोंबर २०२३ च्या बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध शपथ कार्यक्रमात 2704 विद्यार्थी व रात्री 25 ग्रामपंचायती सोबत कॅन्डल मार्च मध्ये 240 महिलांनी सहभाग घेतला.असे एकूण 2,944 जणांनी बालविवाह मुक्त अभियानात प्रतिबंधक शपथ घेतली.नेवासा तालुक्यातील प्राथमिक शाळा,हायस्कूल, अंगणवाडी,ग्रामपंचायत समोर नियोजन करण्यात आलेले होते.
सदरिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बाल विभागाचे अधिकारी,गट विकास अधिकारी,गटप्रवर्तक,गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. आदरणीय प्रेरणास्थान नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व ऊर्जा स्थान विधानजी सर,राजू जी भारद्वाज सर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. तसेच नेवासा तालुक्यातील 25 गावात व विविध शाळेत संस्थेच्या वतीने जन जागृति,कैंडल मार्च,बाल विवाह शपथ कार्यक्रम, विविध स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.
हे बाल विवाह मुक्त भारत अभियान संपूर्ण भारतामधे एकाच दिवशी, एकाच वेळेस कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यात आले होते, सदरील कार्यक्रमाचे आयोजक रामदास गायकवाड अध्यक्ष सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळ यांनी केले व या कार्यक्रमास सौ.लक्ष्मी गायकवाड, पवार कृष्णा, रोहित चांदणे, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,समाजसेवक,भजनी मंडळी, महिला उमेद अभियानाचे गटप्रवर्तक गाव पातळीवरील बचत गटाच्या अध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस समस्त गावकरी उपस्थित होते.