परदेशी मेहेरप्रमींनी सादर केले नाटक :राजा गोपिचंदचे प्ले मध्ये सुंदर सादरीकरण 

अहमदनगर(महेश कांबळे)अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव कार्यक्रमात आज मेहेराबाद टेकडीवरील समाधीस्थळी असणाऱ्या ऍम्पिथियटर मध्ये परदेश्यातील बाबाप्रेमींनी सुंदर अशी नाटक सादर केले.

यामध्ये पारशी भक्त व राजा गोपिचंदचे प्ले मध्ये सुंदर सादरीकरण केले गेले यामध्ये ६५ परदेशी लोकांनी व काही स्थानिक लोकांनी सहभाग घेतला होता

संवाद,संगीतमय व नृत्य व आकर्षक बॅगराउंडवर हे सादर झाले,यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व स्थानिक तसेच परदेशी भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित होते

मुबईहुन एक पारशी गृहस्थ ईश्वर साक्षात्कारासाठी मेहेराबादच्या आश्रमात १९२२ साली बाबाकडे आला होता त्याच्या जीवनातील घटना यामध्ये सुंदर पद्धतीने दाखविल्या गेल्या त्याला येथील मस्त म्हणजे वेडसर लोकांकडून गोपीचंद राजाच्या जीवनावरील नाटिका बसवायला सांगितले मग त्यामध्ये कसे किस्से घडले हे दाखविण्यात आले गोपीचंद राजा कसा ईश्वर मार्गमध्ये संन्यस्थ झाला हे दाखविण्यात आले त्यामुळे त्या पारशी गृहस्थाला बाबानी हळू हळू कसे समजावले हि कथा होती