स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस पथकाने सोयाबीन गहू चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

आळेफाटा(प्रतिनिधी)शेतकऱ्याचे गहू सोयाबीन चोरणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाला यश मिळाले.

गणेश केदार यांच्या वडगावसाहणी येथील फार्महाऊस मधून सोयाबीनचे ३५ कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद जुन्नर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून निलेश लक्षण केवळ,साईनाथ विलास केवळ,रवींद्र गोरक्ष केवळ,राजेंद्र रामदास केवळ,सुनील मोहन काळे,रविराज विजय मोधे या संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून ५६५०किलो सोयाबीनचे ११३ कट्टे व ४८० किलो वजनाचे गव्हाचे ८ कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप जीप ८ लाख ७९हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.