रवी भोजणे यांना ‘नक्षत्र गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर

पुणे : काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नक्षत्रांचं देणं काव्यमंच तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘नक्षत्र गौरव पुरस्कार २०२५’ यंदा मानकरी कवी रवी भोजणे यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता,सायन पार्क नाट्यमंदिर, सायन पार्क, अँटो कार्स्ट सभागृह,पुणे-नाशिक हायवे, शेजारी पुणे येथे होणार आहे.

काव्यमंचाच्या वतीने अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काव्यमंचाच्या वाचन उपक्रमांद्वारे प्रगल्भ होत असलेल्या साहित्य संस्कृतीसाठी योगदान देणाऱ्या कवींना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जातो.यंदा निवड समितीने कवी रवी भोजणे यांच्या साहित्यकार्यास एकमुखाने गौरविले आहे.

समारंभासाठी कवी, साहित्यप्रेमी तसेच मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.