प्रसिद्ध व्यावसायिक रमेशलाल भंडारी यांचे निधन

बेल्हे : राजस्थान राज्यात नातेवाईकांसह देव दर्शनाला गेलेल्या बेल्हे येथील प्रसिद्ध किराणा व्यवसायिक रमेशलालजी बन्सीलाल भंडारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते ६८ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

प्रगतशील शेतकरी स्वप्निल भंडारी,प्रसिद्ध किरणा व्यावसायिक संकेत भंडारी हे मुलगे तर बेल्हे ग्रामपंचायत सदस्या सौ.पल्लवी स्वप्निल भंडारी यांचे ते सासरे तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे चुलते होत.