बेल्हे(प्रतिनिधी) : श्रीपाद वल्लभ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेच्या सभागृहात अध्यक्ष शांतीलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष काशिनाथ गुंजाळ संस्थापक मारुतीशेठ गुंजाळ संचालक पाराजीशेठ बोरचटे, कैलास शिंदे,बन्सीशेठ डावखर,राजेंद्र गुंजाळ,बाळासाहेब गुंजाळ, होनाजी साळे,सोपानशेठ पिंगट,स्मिता वखारिया,सुप्रिया वाघ या संचालकांच्या उपस्थितीत ही सभा झाली.
संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, आर्थिक प्रगती आणि सभासदांना दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी समाधान व्यक्त करत मान्यवरांनी संस्थेचे कौतुक केले.यावेळी सभासदांना यंदा तब्बल १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
सभेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संचालक व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे खजिनदार अनिल गुंजाळ, संजय चंगेडिया, संजय बोरचटे, प्रदीप पिंगट, सदाशिव बोरचटे, सचिन डावखर,शंकर शिंदे,बबन गुंजाळ,प्रकाश जाधव,माऊली चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून सभासदांना लाभांश जाहीर करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले.
संस्थेचे मुख्य व्यवस्थापक राहुल गुंजाळ केदारी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. अहवालात संस्थेच्या ठेवी, कर्जवाटप, वसुली, नफा, खर्च ताळेबंद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संस्थेने गतवर्षी समाधानकारक नफा कमावल्याने सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सभेच्या शेवटी ॲड.अतुल गुंजाळ यांनी आभारप्रदर्शन केले.त्यांनी सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे सांगत संस्थेची प्रगती सातत्याने वाढवण्याचा विश्वास व्यक्त केला.
वार्षिक सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,लाभांश जाहीर झाल्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते.