भोसरी : येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच तर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सायन्स पार्क नाट्यगृह, चिंचवड येथे राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व पुरस्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक नितीनशेठ लोणारी यांच्या हस्ते वृक्षपूजन करून झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी रामचंद्र पंडित होते.
यावेळी कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार डॉ. राजेंद्र झुंजारराव व कवी उत्तम सदाकाळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच कविरत्न पुरस्कार, नक्षत्र राज ज्योतिष रत्न पुरस्कार, काव्यदौलत पुरस्कार, समाजभूषण व उद्योजक गौरव पुरस्कार अशा विविध सन्मानचिन्हांनी मान्यवरांचा गौरव झाला.
दिवाळी अंक स्पर्धेत लोकमंगल मैत्र (सोलापूर) प्रथम, कमांडर नवी मुंबई द्वितीय, तर कालनिर्णय तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले. श्रावणी काव्यलेखन स्पर्धेत दीप्ती कुलकर्णी (हैदराबाद) प्रथम, वैशाली शिरसागर (कोल्हापूर) द्वितीय, अजित राऊळ (सिंधुदुर्ग) तृतीय ठरले.
कार्यक्रमात प्रा. राजेंद्र सोनवणे यांच्या वादळाची अशांतता, आसक्या, सुविचारसंग्रह 2025 या पुस्तकांचे तसेच यूट्यूब चॅनेलचे उद्घाटन झाले.
कवयित्री रूपाली भालेराव यांनी सूत्रसंचालन केले, तर सुनील बिराजदार यांनी आभार मानले.