बेल्हे येथील श्री साईकृपा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना 11 टक्के लाभांश तर संस्थेला 74 लाखांचा नफा

बेल्हे : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्हे (ता. जुन्नर) ची २4 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रामभाऊ शेठ बोरचटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव सूर्यकांत गुंजाळ यांनी केले. संस्थेचे वर्ष अखेर सभासद संख्या 6 हजार 487 तर ठेवी 51 कोटी रुपयांच्या आहेत. 43 कोटी 13 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून संस्थेचा वार्षिक नफा 74 लाख 24 हजार रुपये असून सभासदांना 11 टक्के लाभांश व दीपावली शुभेच्छा भेट वस्तू मध्ये 11 वस्तू देण्याचे मंजूर करण्यात आले.

सभेपूर्वी सभासदांना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सभासदांचे हक्क, कर्तव्य, जबाबदारी व बदललेल्या सहकाराचे धोरण यावर प्रशिक्षण देण्यात आले. सभेची सुरुवात श्री गणेश पूजनाने व श्री साईबाबांच्या आरतीने झाली. सुत्रसंचालन सावकार पिंगट यांनी केले तर अहवाल वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक श्री जीवन संभेराव यांनी केले. या वेळी संस्थेचे चेअरमन श्री सदाशिव रामभाऊशेठ बोरचटे,व्हा. चेअरमन श्री सावकार पिंगट, सचिव श्री सूर्यकांत गुंजाळ पाटिल, संचालक बाळकृष्ण गुंजाळ, गणेश सोनवणे, राकेश डोळस,सचिन चव्हाण, महादू पिंगट,अनिल गुंजाळ, ठकसेन शिंदे, रुपाली गुंजाळ तसेच बडूशेठ गटकळ, सुनील भळगट, कैलास औटी,बसुराज कोळी, केशव काळे, पाराजी बोरचटे, सतीश शिरोळे, प्रभाकर बनकर,दत्तात्रय गुंजाळ,शिवाजी पिंगट, सुनील घोडे, बाळासाहेब दाते, संभाजी चव्हाण, शिवाजी चव्हाण, बाळकृष्ण शिरतर, तुकाराम चव्हाण, संतोष शिंदे, शंकर विश्वासराव इ. मान्यवर ,कर्मचारी व सभासद उपस्थित होते.