अहमदनगर,दि.(महेश कांबळे)केंद्र सरकार,राज्य सरकारच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असून ती नगर तालुक्यातील शेंडी या गावी दाखल झाली.या यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच प्रयागा लोंढे यांनी केले.
शेंडी येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभागाच्या डॉ प्रिया दळे,श्रीमती क्षीरसागर,कृषी सहाय्यक संतोष फलके,कृषी विस्तार अधिकारी नीलकंठ डेरेंगे,जिल्हा सहकारी बँकेचे चेन्नोर,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आतकर,ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे,सुनील देठे,गीता त्र्यंबके,शहेनाजबी पठाण,दत्ता राऊत,श्वेता देठे,जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक लाड, मुख्याध्यापिका संगीता शिंदे,तलाठी निकिता शिरसाठ,विस्तार अधिकारी कापरे,बचत गटाच्या सीआरपी संगीता देठे,अनुसया बोरुडे,फर्जाना सय्यद,आशा वर्कर गायत्री जंगम,नंदा भालसिंग,जयश्री दाणी आदी उपस्थित होते.कार्यक्रम पूर्वी संकल्प यात्रेचा रथ गावातून फिरवण्यात आला.
यावेळी बोलताना प्रयागा लोंढे म्हणाल्या की,कृषी,आरोग्य, महसूल विभागांच्या माध्यमातून शेतकरी,महिला,युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना आपल्या गावात पोहचविण्यासाठी संकल्प रथ आला आहे,या रथाच्या माध्यमातून गावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत.
लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निराधार,विधवा,अपंग असे गावातील ५२ लोकांचे फॉर्म भरण्यात आले असून लवकरच त्यांना अनुदान पेन्शन सुरु होणार आहे तसेच मा आ कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल चालू असून गावाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले असेही लोंढे म्हणाल्या
नीलकंठ डेरेंगे म्हणाल्या विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या आयुष्मान हेल्थ कार्ड,उज्ज्वला योजना,पीएम स्वनिधी योजना,आधार कार्ड आदी विविध योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे.शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे,निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत.या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात.
महिला,युवा,शेतकरी आणि गरीब हे समाजातील आधारस्तंभ असून,यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे.या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून विकसित भारत संकल्प यात्रा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी केले.