जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विद्यमान संचालक धोंडीभाऊ पिंगट यांचे निधन

बेल्हे(प्रतिनिधी)कल्याण अहमदनगर महामार्गावर गुळूचंवाडी येथे ट्रकखाली चिरडले गेलेले गंभीररीत्या जखमी झालेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धोंडीभाऊ पिंगट यांचे शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले.

शुक्रवारी झालेल्या ट्रक अपघातातील धोंडीभाऊ पिंगट हे आज पाचवे बळी ठरले. 

गुळूचंवाडी येथील कमळू उर्फ बाबाजी नाथा भांबेरे यांचा अंत्यविधी कार्यक्रम उरकून बेल्हे येथे घरी परतत असताना शुक्रवारी अपघात झाला होता.अपघातात ट्रकखाली  चिरडलेल्या एकोणीस जणांमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे गंभीररीत्या जखमी झाले होते.त्यांच्यावर आळेफाटा येथे युनिक नावाच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ज्युपिटर खाजगी रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

धोंडीभाऊ पिंगट यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे,एक मुलगी,सुना,जावाई,नातवंडे,दोन भाऊ असा मोठा परीवारआहे.

धोंडीभाऊ पिंगट यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती,संचालक,बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंच,बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक या पदाची जबाबदारी संभाळली.त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी बेल्हे येथील स्मशानभूमीत होणार आहे.