बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अशोक गुंजाळ यांची निवड

जुन्नर -: प्रतिनिधी :-बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक गुंजाळ यांची निवड करण्यात आली.ही निवडणूक प्रक्रिया जुन्नर येथे,सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली.

बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी अशोक जनार्दन गुंजाळ आणि संजय रभाजी बोरचटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.अशोक गुंजाळ यांना दहा तर संजय बोरचटे यांना सात मते पडली,संस्थे च्या सतरा संचालकानी मतदान केले.

बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष पदी अशोक जनार्दन गुंजाळ हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जुन्नर सहाय्यक निबंधक डॉ.गजेंद्र देशमुख यांनी जाहीर केले.

जुन्नर कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे यांच्यासह संचालक मंडळाने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.