नगर | प्रतिनिधी अहिल्यानगर दक्षिणमधील सर्व तालुक्यांतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण संवाद, आढावा व कार्यकारिणी बैठक शनिवार, दि. १२ जुलै रोजी नगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार समीर भुजबळ होते.
बैठकीत संघटनेच्या भविष्यातील दिशा, कामकाजाचा आढावा, आणि सामाजिक कार्य अधिक व्यापक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक पुढील पावले यावर सखोल चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधताना भुजबळ यांनी प्रत्येक समता सैनिकाने जबाबदारीने व निःस्वार्थपणे कार्य करावे, असे आवाहन केले.
नवनाथ खामकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड
याच बैठकीदरम्यान पारनेर तालुक्यातील पानोली येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री. नवनाथ बाबाजी खामकर यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेने त्यांना नेतृत्वाची संधी दिली. एक तरुण, उमदा आणि होतकरू चेहरा म्हणून त्यांच्याकडून तालुक्यातील कार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस समीर भुजबळ यांच्यासोबत ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश संघटक रवी सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, प्रदेश प्रचारक डॉ. नागेश गवळी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष बबनराव घुमटकर, अण्णासाहेब शेलार, सुवर्णा घाडगे, मच्छिंद्रशेठ माळी, मुकुंद सोनटक्के, किसनराव रासकर, संतोष विरकर, प्रशांत शिंदे, श्रीधर गाडीलकर, सचिन खामकर, शंकर रासकर, आकेश जमदाडे, पोपट काळोखे, दिलीप काळोखे, विजय मंडलिक, प्रभाकर घोलप, विशाल जमदाडे, अजित बोदगे, संदीप रासकर, तन्मय खामकर, प्रसाद जमदाडे, अविनाश लोखंडे, विशाल क्षीरसागर, ओम क्षीरसागर, अशोक गायकवाड, बाळासाहेब बोराटे, जालिंदर बोरुडे, वसंत रांधवन, बंडू कोथिंबीरे, अनिल निकम, संजय डाके, अर्जुन मेहेत्रे, रोहित पुंड, सुरेश थोरात, नानाभाऊ गाडीलकर, गोरख आळेकर, धनंजय डहाळे, प्रयाग लोंढे, कल्याण अनारसे, रामदास हजारे, संतोष घोलप, शरद मेहत्रे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक समर्पित कार्यकर्ते आणि महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती
ही बैठक संघटनेच्या बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून कार्य अधिक प्रभावीपणे तळागाळात पोहचेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.