आळे : ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘एनसीसी २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन’ची प्रथम वर्ष भरती प्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे पार पडली. या प्रक्रियेत कॅप्टन विपिन कुमार मल (सेना मेडल) यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण आणि मुलाखती घेण्यात आल्या.
या वेळी सुभेदार प्रसन्नजीत देवनाथ, सी.एच.एम. अमोल बोऱ्हाडे, हवालदार मच्छिंद्र सावंत, सिनियर जी.सी.आय. नंदिता दास, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मोफत मिलिट्री प्रशिक्षण दिले जाते. यामुळे त्यांचा व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रीय सेवा भावना, तसेच सीडीएस, एसएसबी, अग्निवीर, सेंट्रल पोलिस फोर्स अशा परीक्षांसाठी ते पात्र ठरतात. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीही त्यांना बोनस मार्क्स मिळतात.
कार्यक्रमादरम्यान कॅप्टन विपिन कुमार यांनी विद्यार्थ्यांना सेना व इतर सुरक्षा दलांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अजय कुऱ्हाडे होते. त्यांनी कॅप्टन विपिन कुमार यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी एनसीसीद्वारे देशसेवेसाठी तत्पर राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात इतर सन्माननीय सत्कार समारंभ देखील पार पडले:
सुबेदार मेजर तांदळे भाऊसाहेब यांचा सत्कार मा. किशोर शेठ कुऱ्हाडे यांच्या हस्ते,
सुबेदार प्रसन्नजीत देवनाथ यांचा सत्कार मा. सम्राट कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी एनसीसी विभागाची माहिती दिली आणि भविष्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशी विनंती कॅप्टन विपिन कुमार यांना केली.
एनसीसी २ गर्ल्स बटालियनच्या मेजर डॉ. सुषमा कदम यांनी एनसीसी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मुलींसाठी एनसीसी विभागाने केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या आर्मी करिअरसाठी मिळणाऱ्या संधींचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यामध्ये प्रा. संजय वाकचौरे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुळवले, संचालक भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. त्यांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले आणि एनसीसीमधून विद्यार्थी अधिकारी तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात सर्जंट चांदणी कुमारी, प्रीती कनोजिया, निकिता शिंदे, आराध्या खुटाळ यांनी टेबल ड्रिल सादर केली. स्टिक ऑर्डरली प्रीती व गंगा यादव, तर संपूर्ण संचलनाचे नेतृत्व सीनिअर अंडर ऑफिसर समीक्षा लामखडे हिने केले.