समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

बेल्हे:-बांगरवाडी येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, नर्सिंगच्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ, समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य भूतकर, समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. रमेश पाडेकर, डॉ. शिवाजी खेमनार, यशवंत फापाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात प्रा. राजीव सावंत यांनी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा परिचारिका क्षेत्रावर झालेला प्रभाव स्पष्ट केला. “आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणजे परिचारिका वर्ग असून सेवाभाव, शिस्त आणि जबाबदारी या गुणांच्या जोरावर समाजात मोठे परिवर्तन घडवता येते,” असे सांगत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट परिचारक बनून समाजसेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विश्वस्त वल्लभ शेळके यांनी परिचारिकांचे समाजासाठी असलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत सर्वांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.किशोर बोऱ्हाडे, प्रा.हर्षदा गोफणे,आयेशा जमादार,सानिया शेख,उज्वला साळवे,स्नेहल येवले आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पूनम कसबे व तैबा पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सानिया शेख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *