बेल्हे,दि.(प्रतिनिधी)जुन्नर तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या बेल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड होणार आहे. त्यामुळे या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेल्हे ही तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून आर्थिक उलाढाल ही सर्वाधिक आहे त्यामुळे या गावचे उपसरपंच पद ही मानाचे मानले जाते.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री मुक्ताबाई भैरवनाथ ग्रामविकास पॅनल,बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनल
आणि श्री मुक्ताबाई ग्रामविकास परिवर्तन पॅनल यांच्यात लक्षवेधी लढत झाली होती.
या निवडणुकीत बेल्हेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १३ जागेवर विजय मिळविला आहे तसेच याच पॅनलच्या मनीषा जाणकू डावखर या लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाल्या होत्या.
आता उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी तसेच जिल्हा परिषद निवडणूक होईपर्यंत राजेंद्र बबन पिंगट यांची उपसरपंचपदी वर्णी लागेल अशी चर्चा सुरु आहे.ग्रामपंचायत सदस्य कैलास आरोटे,नवनाथ बाबुराव शिरतर,नाजीम गुलाब बेपारी, समीर गायकवाड हे देखील इच्छुक आहेत.उपसरपंचपदी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड होणार आहे. त्यामुळे या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.