उत्तर पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी राजेश डोके यांची बिनविरोध निवड

जुन्नर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या उत्तर पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी राजेश नागुजी डोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक व संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी ही निवड जाहीर केली.


राजेश डोके यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सभासदपदासह जुन्नर तालुका सचिव व माजी तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच अधिकृत दैनिक विक्रेता म्हणूनही ते कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून रुग्णांना फळवाटप, पत्रकार संघटनेतील सभासदांना हेल्मेट वाटप, वारकऱ्यांची सेवा, ऑनलाइन भाषण स्पर्धा, बैठका तसेच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार संघात काम करताना पत्रकार आणि संघटनेचे नाव उज्ज्वल होईल, यासाठी सर्वांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. तसेच राजेश डोके यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


राजेश डोके यांच्या निवडीबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी आमदार अतुल बेनके, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्ष अतुल सिंग परदेशी, कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक संतोष चव्हाण, कुमशेत ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जुन्नर तालुका पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *