बेल्हे, दि.(प्रतिनिधी)दबा धरलेल्या बिबट्याने ऊसतोडणी करणाऱ्या मजुरावर झडप घातली.मोठ्या शिताफीने ऊसतोडणी मजुराने कोयत्याचा धाक दाखवून सुटका केली.या हल्ल्यात ऊसतोडणी मजूर तरुण जखमी झाला. त्याच्या उजव्या हाताला व डोक्याला बिबट्याच्या नख्या लागल्याने जखमा झाल्या आहेत.ही घटना कोंबरवाडी (बेल्हे)येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली हकीकत अशी,कोंबरवाडी(बेल्हे)येथे शिवाजी तुकाराम गुंजाळ यांच्या ऊसाच्या शेतात, कालपासून ऊसतोडणी मजुरांच्या सहाय्याने ऊसतोडणी सुरू होती. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सात – आठ ऊसतोडणी मजूर उर्वरित ऊसाची तोडणी व ऊसाच्या बांधलेल्या मोळ्या जमा करत होते. यावेळी ऊसाच्या शेतात असलेल्या बिबट्याने अचानक सुरेश नामदेव माळी (वय – २८ ) वर्षे मुळ रा. चाळीसगाव जि. जळगाव या ऊसतोडणी मजुरावर झेप घेत हल्ला केला.
यावेळी सोबतच्या इतर ऊसतोडणी मजुरांनी आरडाओरडा केल्याने तसेच संबंधित जखमी झालेल्या ऊसतोडणी मजुराने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत हातातील ऊस तोडणीचा कोयता उगारल्याने बिबट्याने पळ काढला. यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्या लागल्याने ऊसतोडणी मजुराच्या उजव्या हातावर खोलवर जखमा झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी संबंधित शेतकरी शिवाजी गुंजाळ यांच्यासह त्यांच्या मुलाने, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजूरास, तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याबाबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टी. एल. गुंजाळ यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. दरम्यान बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. असीम आतार यांनी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजुरावर प्राथमिक उपचार केले. यावेळी संबंधित शेतकरी शिवाजी गुंजाळ यांच्यासह त्यांच्या मुलाने, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजूरास, तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याबाबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टी. एल. गुंजाळ यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. दरम्यान बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. असीम आतार यांनी, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोडणी मजुरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमी ऊसतोडणी मजुरास पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कोंबरवाडी परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असून, बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे दिवसाही बिबट्या दिसत असल्याचे शिवाजी गुंजाळ यांनी सांगितले. दरम्यान शासनाच्या वनविभागाने परिसरात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी, ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टी. एल. गुंजाळ यांनी केली आहे.
फोटोचा मजकूर-बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला तरुण